Header Ads

  • ताजा खबरें

    पनवेल येथे 6 जानेवारीला होणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

    on 6 january hindu janjagriti samiti at panvel news badlapur vikas marathi daily पनवेल - केवळ 2 टक्के ख्रिश्‍चन लोकसंख्या असलेल्या पनवेल शहरामध्ये 16 टोलेजंग चर्च कशासाठी ? इतके भव्य चर्च उभारण्यासाठी आणि वर्षभर त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अर्थसाहाय्य कुठून होते ? प्रिस्ट-नन्स् यांच्याद्वारे येथील रुग्णालयांमध्ये प्रार्थनेच्या नावाखाली टाकण्यात येत असलेले धर्मांतराचे भावनिक जाळे, अशा प्रकारे शहरात गरीब, असाहाय्य हिंदूंचे आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी चालू असलेले धर्मांतराचे षड्यंत्र यांसह हिंदु धर्मावर होत असलेले विविध आघांत याविषयी संघटित होऊन आवाज उठवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील मिडल क्लास सोसायटीचे मैदान येथे 6 जानेवारीला सायं. 5 वाजता भव्य हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, लष्कर-ए-हिंद चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल हे त्यांच्या जाज्वल वाणीतून धर्मप्रेमींना संबोधित करणार आहेत. पनवेल पंचक्रोशीसह रायगड जिल्ह्यातील विविध भागांत या सभेचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला असून समस्त हिंदुत्वनिष्ठांनी ही सभा यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या सभेविषयी माहिती देण्यासाठी 2 जानेवारीला येथील शासकीय विश्रामगृह आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. विनायक वाकडीकर हे आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण गावातून सभास्थळी क्रांतीज्योत आणणार आहेत, अशी माहिती या वेळी श्री. सुर्वे यांनी दिली. या वेळी सनातन संस्थेच्या सौ.अर्पिता पाठक आणि श्री. विनायक वाकडीकर उपस्थित होते.   
      या वेळी श्री. नरेंद्र सुर्वे म्हणाले, या सभेसाठी ठिकठिकाणी हिंदुत्वनिष्ठांच्या बैठका घेण्यात आल्या असून या भागांतील मंदिरांचे विश्‍वस्त, मंडळे यांच्या भेटी घेऊन त्यांना सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच घरोघरी जाऊन सभेच्या निमंत्रणाची हस्तपत्रके वितरीत करण्यात आली आहेत. भित्तीपत्रके, फ्लेक्स फलक, मेगाफोनद्वारे उद्घोषणा आदी माध्यमांतून सभेचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला आहे. ‘वॉट्स अप, ट्वीट, फेसबूक‘, आदी सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे सभेचा प्रचार करण्यात आला असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 
    श्री. विनायक वाकडीकर म्हणाले, आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मस्थान असलेल्या शिरढोण या  पुण्यभूमीतून अधिकाधिक ग्रामस्थ या सभेला उपस्थित रहाणार आहेत. समस्त हिंदू बांधवांनीही अधिकाधिक संख्येने या सभेला उपस्थित रहावे.
    सनातन संस्थेच्या सौ.अर्पिता पाठक म्हणाल्या, आज हिंदूंना कुठेही धर्मशिक्षण दिले जात नाही. ‘मेकॉले शिक्षणपद्धती’तून शिक्षण दिले जात आहे. हिंदूंची मुले कॉन्व्हेंट शाळेत शिकत आहेत. हिंदूंचे धर्मांतर हा त्याचाच  परिणाम आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणे, हाच यावर एकमात्र उपाय आहे. धर्मांतर रोखण्यासाठी राज्यात त्वरित धर्मांतरबंदी कायदा आणणे आवश्यक आहे. या सभेच्या माध्यमातून ही मागणी करण्यात येणार असून त्यासाठीच आम्ही या सभेत सहभागी झालो आहोत.
    सभेच्या प्रचारासाठी 4 जानेवारीला वाहनफेरीचे आयोजन 
    या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रचार अंतिम टप्प्यांत आला असून जनजागृतीसाठी 4 जानेवारीला भव्य वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सायं. 5 वाजता येथील ओरियन मॉलच्या येथून या फेरीला प्रारंभ होणार असून बसस्थानक-सावरकर चौक-टिळक रोड-टपालनाका-गांधी हॉस्पिटल या मार्गाने फेरी निघणार असून शिवाजी चौक येथे फेरीची सांगता होणार आहे. सर्व धर्मप्रेमी हिंदूंनी पद, पक्ष, संघटना, संप्रदाय, जात-पात आदी सर्व भेद विसरून एक हिंदू म्हणून या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9167766130 या भ्रमणभाषवर संपर्क करावा, असे आवाहन समितीच्या वतीने श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad