Header Ads

  • ताजा खबरें

    सिडकोची सेक्टर- 24, वाशी येथे अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई

    मा. उच्च न्यायालयाच्या सन 2012 च्या याचिका क्र. 138 वरील आदेशानुसार सिडको किंवा महाराष्ट्र शासनाकडून कोणताही विकास परवाना न घेता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे निर्देश न्यायालयामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुसार श्री. शिवराज एस. पाटील, मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे, सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम नियंत्रक (उत्तर) यांच्या पथकाने दि. 27 डिसेंबर, 2018 रोजी सेक्टर- 24, वाशी, नवी मुंबई, जि. ठाणे येथे अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईचे आयोजन केले होते. सदर कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे :
    सेक्टर- 24, वाशी येथील भूखंड क्र. 59 ते 62 यांवर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या 25 कच्च्या स्वरूपातील झोपड्या निष्कासित करण्यात येऊन अंदाजे 1200 चौ.मी. क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. 
    वर नमूद करण्यात आलेली अतिक्रमणे-अनधिकृत बांधकामे इ. सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करून, सिडको महामंळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आली होती व सिडको प्रशासनाने योग्य ती कायदेशीर प्रकिया अवलंबून ही अतिक्रमणे निष्कासित केली.  
    ए.पी.एम.सी. पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सतिष निकम व 105 पोलीस कर्मचारी यांच्या सहाय्याने सदर कारवाई यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. या कारवाईवेळी सिडकोतील श्री. पी. बी. राजपूत, नियंत्रक (अनधिकृत बांधकामे-उत्तर), श्री. सुनिल तांबे, क्षेत्राधिकारी, श्री. सी. व्ही. तांबडे, वरिष्ठ आरेखक यांसह सिडकोचे पोलीस पथक, एमएसएफ कर्मचारी व सुरक्षा रक्षक उपस्थित होते. 
    सदर कारवाई पार पाडतेवेळी 20 कामगार तैनात करण्यात येऊन 1 जेसीबी, 1 पोकलेन व 1 ट्रक या साधनांचा वापर करण्यात आला. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad