Header Ads

  • ताजा खबरें

    युवकांनी फेसबुक व व्हॉट्सअपचा वापर योग्य करावा - जयपाल पाटील


    अलिबाग - सध्याच्या काळात फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वापरणे अतिशय गरजेचे झाले असून ज्ञानार्जन करण्यास त्याचा वापर होतो. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने अनोळखी माणसासोबत मैत्री करु नये व व्हॉट्सअॅपवर येणारे फॉरवर्ड मेसेज वाचल्याशिवाय मित्र परिवाराला पाठवू नये. त्यामुळे आपल्यावरही कधी केव्हा आपत्ती येवून जेलची हवा खावी लागेल, अशी माहिती आपत्ती व सुरक्षा विषयक तज्ञ जयपाल पाटील यांनी आगरसुरे येथील यलो हाउस येथे आर.जे.ठाकूर कॉलेज ऑफ आर्ट्स व कॉमर्स यांनी आयोजित केलेल्या श्रम संस्कार शिबिरात सांगितले.

    प्रारंभी कॉलेजचे प्राध्यापक अक्षय सिंग यांनी जयपाल पाटील यांच्या परिचयात सांगितले की, आपत्ती व सुरक्षा विषयक महाराष्ट्रात व्याख्यानाद्वारे २४ हजार नागरीकांना प्रशिक्षण दिले आहे. जयपाल पाटील यांनी यावेळी साप, विंचू दंश, पाण्यात बुडाल्यावरील प्रथमोपचार करुन दाखविला. त्याचबरोबर मुलींनी आपल्या सुरक्षेसाठी पोलिसांचा प्रतिसाद अॅपचा वापर कसा करावयाचा याची माहिती दिली. त्याचबरोबर अपघातप्रसंगी वाहतुक पोलिस आणि १०८ रुग्णवाहिकेचा वापर कसा करावयाचा हे सांगितले.
    रायगड जिल्हा वाहतुक शाखेचे पोलिस हवालदार बी.एन.पाटील हे फोन करताक्षणीच २० व्या मिनिटाला हजर झाले. तर १०८ रुग्णवाहिकेची माहिती येथे येवून डॉ. पांडे यांनी दिली आणि साधनांची माहिती पायलट स्वप्निल म्हात्रे यांनी दिली. त्यांच्यासोबत डॉ. ज्ञानेश्वर आखले, रविंद्र परदेशी, पुरुष परिचारक निलेश कदम हे उपस्थित होते. जयपाल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत, पोलिस निरीक्षक अनिल पारसकर, जिल्हा वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश व-हाडे, सुबोध राउत, प्रा. रक्षा माहिमकर यांचे आभार मानले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सागर सिंह यांनी तर आभार निरज विश्वकर्मा यांनी मानले. या कॉलेजची २५ मुले व २५ मुली व ३ प्राचार्य, पत्रकार अशोक म्हात्रे, विकास रणपिसे आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad